ॲन्टिडोट ही स्मिता देशपांडे यांची कोरोना पार्श्वभूमीवरची ज्ञानात्मक कादंबरी आहे, जी तथ्य आणि कल्पना, गोपनीयता आणि विज्ञान, सत्ता आणि संकट यामधील सीमारेषा पुसून टाकते. एका भारतीय गुप्तहेराला एक थरारक गुपित सापडते — वुहानमध्ये हेतुपुरस्सर पसरवलेला एक नवीन विषाणू. पण तो त्याच्या शोधाचा अधिक तपशील देण्याआधीच गंभीर आजारी पडतो. आता ही जबाबदारी त्याच्या मुलीवर, जी एक प्रतिभावान विषाणुतज्ज्ञ आहे- तिच्यावर आणि एका सहगुप्तहेरावर येते. ज्याने हा विषाणू पसरवला, त्या अज्ञात व्यक्तीला शोधून त्याने तयार केलेला संभाव्य ॲन्टिडोट मिळवायची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मग सुरू होतो पाठशिवणी चा खेळ.
त्यांचा थरारक शोध राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे जातो आणि चीनच्या राजकीय इतिहासाचे धक्कादायक पैलू, त्याची आर्थिक वर्चस्वाकडे वाटचाल आणि वैद्यकशास्त्राच्या आड लपलेली सत्तेची रहस्यमय दालने उघडत कथा आपल्याला गुंतवून ठेवते. ही कथा वास्तवातील ऐतिहासिक घटनांवर आधारलेली असली तरी ती तुम्हाला कल्पनाविश्वातील एक गूढ आणि नाट्यमय प्रवासावर घेऊन जाते — जिथे प्रश्न असतात, रहस्यं असतात, आणि नैतिक संघर्ष असतात.
ते वेळेत प्रतिकारक- ॲन्टिडोट, शोधू शकतील का?
हा विषाणू पसरवण्यामागे उद्देश काय होता?
भारतासह जागतिक महासत्ता यामध्ये कोणती भूमिका बजावतील?
आणि एका शोधामुळे संपूर्ण महामारीची दिशा बदलू शकते का?ॲन्टिडोट ही केवळ एक थ्रिलर नाही तर ती एक वैचारिक प्रयोगशाळा आहे, जी तुम्हाला विचार करायला भाग पाडते: "कदाचित ही कल्पना वास्तवाच्या अधिक जवळ आहे, याची आपण कल्पनाही करू शकत नाही!"
top of page
₹400.00Price
bottom of page
