लेखिका: रेणू दांडेकर
मुलांचे बोबडे बोल, आजीची गोष्ट, अक्षरांचा लळा नी मुलांची भाषा... मुलांबरोबरचं बोलणं अधिक समृद्ध होण्यासाठी
पीपल्स कॉलेज, नांदेड येथील वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापिका. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ एज्युकेशन, अनौपचारिक शिक्षण, स्त्री मासिकात संपादन साहाय्य.
१९८४ पासून लोकमान्य टिळक विद्या मंदिर, चिखलगाव येथे मुख्याध्यापिका.
बालभारती (इ. १ली ते ५वी मराठी पाठ्यपुस्तक संपादन समिती) सदस्या. बालचित्रवाणी, शैक्षणिक तंत्रज्ञान कक्ष, वरळी (ध्वनिफीत निर्मिती) विशेषतज्ज्ञ, महाराष्ट राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (SCERT) डी, बी. एड. अभ्यासक्रम पुनर्रचना समिती सदस्य, ऑपेरशन ब्लॅकबोर्ड सदस्य, माता पालक संघ पुस्तिका संपादन, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई - तेजस्विनी प्रकल्प सदस्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळ इयत्ता ९वी संयुक्त मराठी पुस्तक संपादन समिती सदस्य.
संपादकीय सल्लागार : मासिक जडण-घडण, पुणे
लेखन : रूजवा, कणवू, मुलांशी बोलताना, आता शाळेत जायचं, गाणी मुलांची-झाडांची, तुला आई आहे, घरट्यांची गोष्ट इ. पुस्तके प्रसिध्द. या पुस्तकांना विविध पुरस्कार. केसरी, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकसत्ता, लोकमत, मासिक जडण-घडण यात लेखमाला प्रसिध्द.
पुरस्कार : आण्णा कामतेकर पुरस्कार, तेजस पुरस्कार, टिळकनगर शिक्षण संस्था, आचार्य पुरस्कार, आदर्श शिक्षण पुरस्कार, मुलुंड सेवा संघ पुरस्कार, धर्मसेवाश्रम देवरूख पुरस्कार, गुरूवर्य अ. आ. देसाई पुरस्कार, बाया कर्वे पुरस्कार, पुणे.
प्रवास : अमेरिका, कॅनडा, जर्मनी
top of page
₹100.00Price
bottom of page