'भारतीय प्रजासत्ताक@75' हा ग्रंथ देशाच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचं ठोस आणि समर्पक चित्रण करत एका नव्या दृष्टिकोनातून इतिहास मांडतो. देशाच्या वाटचालीतल्या निवडक घटना, संस्था, उपक्रम—अशा विविध क्षेत्रांमधील टप्प्यांचा आढावा आणि दीर्घकालीन परिणाम करणार्या सकारात्मक ७५ घटना या ग्रंथात घेतल्या आहे.
कला, साहित्य, क्रीडा, तंत्रज्ञान, नवनिर्माण, उद्योग, शेती, पर्यावरण, भारतीय राज्यघटना, प्रसारमाध्यमे, कायदे निर्मिती अशा अनेकविध क्षेत्रांतील घडामोडींवर सुसंगत माहिती आणि आकडेवारीसह प्रकाश टाकण्यात आलेला आहे. भारत आता एका समर्थ राष्ट्राप्रमाणे जागतिक पातळीवर योगदान देण्यासाठी सज्ज होत आहे. शताब्दीच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला "भारतीय प्रजासत्ताक@75" हा ग्रंथ नक्कीच प्रेरणा देणारा आहे.
भारतीय प्रजासत्ताक @75 | Bharatiya Prajasattak @75
₹200.00 Regular Price
₹180.00Sale Price