लेखक: अविनाश धर्माधिकारी, (Ex LAS)
माजी सनदी अधिकारी, उत्कृष्ट प्रशासक, वक्ते, लेखक, कवी, संघटक आणि जिकणारा समाज घडविण्यासाठी नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून श्री. अविनाश धर्माधिकारी सर्वपरिचित आहेत.
श्री. अविनाश धर्माधिकारी १९८६ मध्ये आय. ए. एस. झालेले महाराष्ट्रातील एकमेव होते. या सेवेत जाण्यापूर्वी दहा वर्षे स्वयंसेवी कार्यकर्ते, मुक्त पत्रकार म्हणून त्यांनी देशभर भ्रमंती केली त्यानंतरच्या प्रशासकीय सेवाकाळात प्रांताधिकारी (फलटण), राज्याच्या मुख्य सचिवांचे विशेष कार्य अधिकारी (मुंबई), संचालक पुराभिलेख विभाग (मुंबई), रत्नागिरी व अमरावती येथील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक व महिला व बालकल्याण विभाग, जिल्हाधिकारी रायगड आणि मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अशा विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी प्रचंड कार्यक्षमतेनं सांभाळल्या
१ मार्च १९९६ रोजी आय. ए. एस. सेवेचा राजीनामा देऊन स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासनासाठी जनआंदोलन उभं केलं राजकारणातही सक्रिय सहभाग घेतला. नागरिक कृती योजना सुरू केली २००१ मध्ये नेहरु युवा केंद्र संघटन या भारत सरकारच्या संस्थेचे महासंचालक या पदावरही ते कार्यरत होते
स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन, उद्योजकता विकास आणि व्यक्तिमत्त्व विकसन यासाठी काम करणाऱ्या 'चाणक्य मंडल' या संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून सध्या ते कार्यरत असून 'चाणक्य मंडल' या मराठी मासिकाचे मुख्य संपादक आहेत.
अस्वस्थ दशकाची डायरी या पुस्तकासह रात्र गहिरीच्या तिसऱ्या प्रहरी (काव्यसंग्रह), नवा विजयपथ, नागरिक ही त्यांची गाजलेली अन्य पुस्तकं आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, आपण त्यांच्यासमान व्हावे, नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी, सुवर्णयुगाच्या स्वप्नासाठी, अवघे विश्वचि माझे घर या विषयांवरील त्यांच्या व्याख्यानमालांच्या दृक-श्राव्य ध्वनीचित्रफितीही आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरतील, प्रस्तुत पुस्तकांत त्यांनी मराठी भाषा, शिक्षणपद्धती, जागतिकीकरणाचे आव्हान, करिअर मार्गदर्शन, आदर्श शिक्षक-पालक आणि वाचकांसाठी काही महत्त्वाची सूत्रे मांडतानाच जिकणारा समाज घडविण्यासाठी कोणत्या मार्गाने आपण सर्वांनी मिळून साधना केली पाहिजे, याचं नेमकं दिग्दर्शन केलं आहे. देशासमोरील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी, स्व-विकासापासून समाजविकासासाठी आणि जिंकणारा समाज घडविण्यासाठी कोणती सूत्रे आपण स्वीकारली पाहिजेत याचं मूलभूत चितन आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल!
top of page
₹150.00Price
bottom of page