ज्येष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वर्षातील पदार्पणाच्या ऐतिहासिक क्षणी त्यांचीच ही 'अक्षर-ओंजळ' आपल्या हाती देताना खूप आनंद होत आहे. शंभराव्या वर्षी लेखक म्हणून एखाद्या प्रतिभावंत साहित्यिकाचं पुस्तक त्यांच्याच साक्षीनं प्रकाशित होणं हा साहित्यविश्वातील खूपच दुर्मिळ योग म्हणावा लागेल.
याशिवाय संतसाहित्यातील बोधकथा, ललित लघुकथा, घरगुती प्रसंगातील विनोद, मनुष्यस्वभाव, पोरांच्या खोड्या, शिवचरित्रासह एकूणच इतिहासातील अनेक घटनांच्या निमित्तानं अधोरेखित झालेलं घोडा या प्राण्याचं महत्त्व असेही हलके-फुलके माहितीपर वाचनीय लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहेत.
ओंजळ | Onjal
₹175.00Price
