आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीपासून आजच्या जागतिकीकरणाच्या युगातील शैक्षणिक बाजारपेठेपर्यंतच्या हजारो वर्षांच्या प्रवासात गुरु, आचार्य अध्यापक, शिक्षक, प्राध्यापक अशा संज्ञा बदलत राहिल्या. पण शिक्षकाचं-गुरुल स्थान तसंच अढळ राहिलं. बदललं ते शिक्षकाच्या कामाचं स्वरूप. शिकवण्याची पद्धत, शिक्षणाची साधनं. उलट सध्याच्या विभक्त कुटुंबव्यवस्थेमुळं आई-वडिलांनंतर शिक्षक आणि शिक्षण संस्थांनाच विद्यार्थ्यांचं 'सांस्कृतिक पालकत्व स्वीकारावं लागतं. उत्कृष्ट शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना, शाळेला आणि समाजाला आकार देताना नकळतपणे स्वतःलाही आकार देत असतो. स्वतःलाही घडवत असतो. असे स्वतः सह समोरच्या विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक हीच आपल्या देशाची फार मोठी संपत्ती आहे, हे सर्वांनीच आवर्जून लक्षात घ्यायला हवं.
डॉ. सागर देशपांडे संपादित ह्या पुस्तकात मान्यवरांचे लेख आहेत:
डॉ. रघुनाथ माशेलकर
अविनाश धर्माधिकारी
न्या. नरेंद चपळगावकर
डॉ. विजय भटकर
ॲड. रावसाहेब शिंदे
प्रा. वा. ना. अभ्यंकर
डॉ. सुनीलकुमार लवटे
विवेक सावंत
डॉ. अरूण निगवेकर
डॉ. विजया वाड
प्रा. जयदेव डोळे
प्रा. प्रवीण दवणे
प्रा. माधुरी शानभाग
डॉ. श्रीपाद जोशी
रेणू दांडेकर
डॉ. अनिलराज जगदाळे
डॉ. श्याम जोशी
वि. वि. चिपळूणकर
डॉ. द. ता. भोसले
डी. बी. पाटील
top of page
₹150.00Price
bottom of page